उपक्रम


कृषी प्रदर्शन व शेतकरी बांधवांसाठी उपक्रम

भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो या कृषिप्रधान देशात अनेक नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग या भागातील शेतकऱ्यांना व्हावा या हेतूने जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शन भरविले जाते. सहकार महर्षी शामराव पाटील-यड्रावकर यांच्या जयंतीनिमित्त 23 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर असे तीन दिवस हे प्रदर्शन जयसिंगपूर येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर परिसरात आयोजित करण्यात येते. या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना विविध तंत्रज्ञानाची माहिती व्हावी याकरिता प्रात्यक्षिके दाखविली जाते,या कृषी प्रदर्शनामध्ये सांगली, कोल्हापूर जिल्हयातील अंदाजे 70 ते 80 हजार शेतकरी बांधव हजेरी लावतात. या प्रदर्शनामुळे अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या या कुशल नेतृत्वाखाली हे प्रदर्शन भरविले जाते,या प्रदर्शनामध्ये गाई,म्हशी यासह अनेक प्रजातींचे जनावरे याठिकाणी आणून त्याचीही माहिती दिली जाते. विविध जातीच्या तांदूळ महोत्सव भरविले जाते. शेतकऱ्यांना या भागातील हवामानाचा अंदाज समजावा म्हणून जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात आधुनिक हवामान मापक यंत्र बसविले, कृषी प्रदर्शनामध्ये 3 भाग्यवंतांना रोख रकमेसह पारितोषिके दिली जातात तसेच स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला जातो. शेतकऱ्यांना आपल्या जमिनीची प्रत कळावी म्हणून म्हणून माती परीक्षण सुरू केले. या कृषी प्रदर्शनामुळे अनेक शेतकऱ्यांनी लाभ झाला आहे. शिरोळ तालुक्यामधील अति पाण्याच्या वापर व रासायनिक खतामुळे जमीन क्षारपड बनली आहे, हजारो एकर जमीन क्षारपड बनल्याने शेतकरी आर्थिक अधिष्ठानात सापडल्याने, त्यांना बाहेर काढण्यासाठी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या वतीने अल्प व्याजदरामध्ये क्षारपड जमीन सुधारणा योजनेचा शुभारंभ या बँकेचे संचालक राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी हाती घेतला आहे यामुळे क्षारपड जमीन धारक शेतकऱ्यांच्या मध्ये उत्साहाचे वातावरण व आशेचा किरण निर्माण झाला आहे त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल शेतकऱ्यांतून समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


कॅन्सर पूर्व शिबिर उपक्रम

दक्षिण भारत जैन सभेच्या जैन महिला परिषदेमार्फत शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये महिलांसाठीच्या मोफत आणि गर्भाशय मुखाच्या कॅन्सरपूर्व निदान तपासणी शिबिरामध्ये तब्बल ३००४ महिलांची तपासणी करण्यात आली. सांगली,कोल्हापूर ,बेळगांव व कर्नाटक सीमा भागातील शेकडो गावातून महिलांनी सहभाग नोंदविला जगभरामध्ये चाचणीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग हा विक्रमी होता. या शिबिरामधे स्त्रियांचे कॅन्सरतज्ज्ञ डॉ.अनिल मगदूम, डॉ.अनिल तकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बेंगलोर ,मुंबई ,पुणे ,कराड, कोल्हापूर, सांगली येथील ७० पेक्षा अधिक स्त्रीरोगतज्ञ ,२०० परिचारिका ,१०० डॉक्टर्स पाचशेपेक्षा अधिक स्वयंसेवक उपस्थित होते. या उपक्रमामध्ये सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटल, भारती विद्यापीठ कोल्हापुर, हृदया कॅन्सर हॉस्पिटल, महात्मा गांधी कॅन्सर हॉस्पिटल ,निरामय हॉस्पिटल यांचा सहभाग होता. यावेळी शरद इन्स्टिट्यूटचे चेअरमन राजेंद्र पाटील-यड्रावकर, दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष डी. ए. पाटील, चेअरमन सागर चौगुले, व्हा. चेअरमन रावसाहेब पाटील, मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील, लठ्ठेचे चेअरमन शांतिनाथ कांते, माजी महापौर सुरेश पाटील, उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर , एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे, सौ. पद्मिनी चाकोते, सौ.नितू पाटील ,सौ.किशोरी आवाडे, संजय शेटे तसेच परिसरातील तज्ञ डॉक्टर्स व पॅथॉलॉजी यांच्यासह राजेंद्र झेले, शांतीनथ नंदगावे, पंचायत समितीच्या सदस्या सौ.मीनाक्षी कुरडे ,नगरसेविका सौ.संगीता पाटील चिंचवाडकर, सौ.दिपा झेले, प्रेमला मुरगुंडे ,संभाजी मोरे, महेश कलगुटगी यांच्यासह दक्षिण भारत जैन सभेचे पदाधिकारी तसेच जैन महिला परिषदेच्या अध्यक्षा सौ. चांदनी आरवाडे उपाध्यक्षा सौ.स्वरूपा पाटील-यड्रावकर ,सेक्रेटरी सौ. मीना घोदे,श्रीमती अनुपमा मुळे तसेच शरद इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक, शिक्षकेतर, कर्मचारी यांचे अनमोल सहकार्य व उपस्थिती होती.


आरोग्य शिबीरे व उपचार

राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशन, जयसिंगपूर व अपंग कल्याण पुनर्वसन संस्था, नांदणी शिरोळ तालुक्यातील राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशनच्या वतीने गेली अनेक वर्षे झाली,अनेक विविध उपक्रम राबविण्यात आले यांच्या माध्यमातून मेंदू व मूत्रपिंड विकार ,कॅन्सर अशा दुर्धर व्याधीग्रस्त रुग्णांना मुंबई, पुणे आदी भागातील नामवंत तज्ज्ञांकडून किमान ५४० हून अधिक रुग्णांच्या वर मोफत औषधोपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या.तसेच अपंग संस्थेमार्फत अपंगांना व निराधारांना शासकीय तंत्रनिकेतन अंतर्गत मेणबत्ती बनविणे, शिलाई यंत्रे चालवणे, मोबाईल रिपेअरी अशा वेगवेगळे प्रशिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित केले व स्वावलंबी बनविले. अनेक कर्णबधिर व्यक्तींना मोफत श्रवणयंत्र वाटप करण्यात आले. दोनशेच्यावर अपंग व गरीब लोकांना 21 दिवस मोफत तीर्थक्षेत्र दर्शन घडवून आणले. याबरोबरच जयपुर फूट , अपंगांना तीन चाकी सायकल, अंध व्यक्तींना काठी, अपंगाना कुबड्या याचे मोफत वाटप करण्यात आले. या फाउंडेशनच्या माध्यमातून अपंग निराधारांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, सोशल फौंडेशनचे कार्यकर्ते सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर आहेत.


विवाह सोहळे, चारा वाटप व प्रशिक्षण उपक्रम

राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशन व जयसिंगपूर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा 2007, 8 व 9 या तीन वर्षामध्ये करण्यात आला. अंदाजे 50 हून अधिक सर्व धर्मातील मुला-मुलींचे विवाह या फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आले असून वधू-वरांना कपडे साहित्य, मनी मंगळसुत्र देण्यात आले होते, याचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक समाजातल्या रिती-रिवाजाप्रमाणे हा सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला होता. या विवाह सोहळ्यास स्वर्गीय मदनभाऊ पाटील (माजीमंत्री) यांनी उपस्थित राहून या मंडळाच्या कार्यकर्त्यांना कौतुकाची थाप मारली,असे विवाह सोहळे सातत्याने पार पाडावे अशी इच्छा त्यांनी या मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या कडे व्यक्त केली होती. राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते, गरजू व गरीब विद्यार्थ्यांनाही शालेय साहित्याबरोबर गणवेश वाटप करण्यामध्ये आघाडीवर असल्याने विद्यार्थ्यांमध्येही या फाउंडेशन बद्दल आदर व आपुलकीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच 2012-13 साली दुष्काळग्रस्तांसाठी राजेंद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त चारा वाटप करण्यात आला होता. यामध्ये सुखा व ओला चाऱ्याचा समावेश करण्यात आला होता. तसेच ग्रामीण व शहरी भागातील मुला-मुलींच्या साठी पोलीस भरतीपूर्व तयारीसाठी एकविस दिवसाचे तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिबिर व प्रशिक्षण देण्यात आले होते.या शिबिरामध्ये अनेकांना फायदा झाला. तसेच नांदणी या परिसरामध्ये वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्यात आले होते.