अभिप्राय


आमदार जयंत पाटील

प्रदेशाध्यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महाराष्ट्रराज्य

राजेंद्र पाटील-यड्रावकर सहकार, समाजकारण आणि राजकारणातील आमचे तरुण सहकारी मित्र, सहकाररत्न शामराव पाटील यांच्या निधनानंतर राजेंद्र यांच्यावर मोठी जबाबदारी पडली. नव्याने सुरू केलेला साखर कारखाना, त्यात साखर उद्योगांमध्ये अतिशय अडचणीचा सुरू असलेल्या काळ ,या परिस्थितीतही राजेंद्र यांनी स्वकर्तृत्वाने कारखाना तर चालवलाच परंतु अडचणीत असलेले कोल्हापूर जिल्हा सुतगिरणी पुन्हा जोमाने सुरू केली. सहकारातील मागील काही वर्षांमध्ये राजेंद्र यांनी उभे केलेले काम या क्षेत्रातील नव्या पिढीला मार्गदर्शक ठरावे असेच आहे. परिसरातील सभासद शेतकऱ्यांबरोबरच त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणसाला ते आपल्या परीने सहकार्य मदत करीत असतात. त्यामुळे शिरोळ हातकणंगले परिसरात त्यांना मोठा जनाधार लाभत आहे. राजेंद्र यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!!


मा.आमदार श्री. हसन मुश्रीफ

माजी मंत्री

शिरोळ व हातकणंगले तालुका क्षेत्रात राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सहकार आणि शिक्षण क्षेत्रात उत्तम काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ते आमचे सहकारी आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाला ताकद देण्याचे काम सर्वप्रथम स्वर्गीय शामराव पाटील-यड्रावकर यांनी केले. त्यांची दोन्ही मुले राजेंद्र आणि संजय पाटील-यड्रावकर यांनी कधीही पक्षांशी प्रतारणा केली नाही, मागील वेळी म्हणजे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र यांना चांगली मते मिळाली, पराभवास न जुमानता त्यांनी पुन्हा जनसामान्यांची सेवा करण्याचे काम अखंडित सुरू ठेवले आहे. अनेक सहकारी आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमातून राजेंद्र वंचित उपेक्षितांसाठी काम करीत आहे. मला खात्री २०१९ च्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत शिरोळची जनता राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनाच आपला लोकप्रतिनिधी बनवतील आणि स्वर्गीय शामराव अण्णांचे स्वप्न साकार करण्यासाठी मी स्वतः राजेंद्र यांच्या मागे ताकद उभी करणार आहे.


आमदार सतेज उर्फ बंटी पाटील

माजी गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र

आमचे तरुण सहकारी मित्र राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शिरोळ हातकणंगले तालुका परिसरात आपल्या कार्यशैलीने मोठे काम उभे केले आहे. आधुनिकीकरणाचा स्वीकार करताना जुन्या परंपरा कायम राखत या भागात सर्व क्षेत्रात त्यांनी आपली घौडदौड सुरू ठेवली आहे. स्वर्गीय शामराव पाटील-यड्रावकर यांनी उभारलेल्या अनेक संस्था त्यांनी नावारुपास आणल्या तर स्वकर्तुत्वाने त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम केले आहे. डिप्लोमा, डिग्री कॉलेज ,कृषी महाविद्यालय ,आयटीआय या त्यांच्या शैक्षणिक संस्था नामांकित शिक्षण संस्थांच्या यादीत त्यांचा समावेश झाला आहे.विकासाची प्रचंड दूरदृष्टी असलेले नेतृत्व शिरोळ व हातकणंगले परिसरात बहरत आहे. मला खात्री आहे शिरोळच्या राजकीय पटलावर राजेंद्र यांना लवकरच मोठा सन्मान प्राप्त होईल. त्यांच्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..!!


रावसाहेब पाटील-बोरगावकर

अध्यक्ष-दक्षिण भारत जैन सभा

राजेंद्र पाटील-यड्रावकर अलीकडच्या काळामध्ये सहकार क्षेत्रामध्ये अल्पावधीत यशस्वी झालेले व्यक्तिमत्व आहे अशी माझी धारणा आहे, यामागे त्यांच्याकडे असलेली जिद्द, चिकाटी व प्रचंड मेहनत घेण्याची तयारी ही कारणे नक्की असू शकतात. माझे मित्र स्वर्गीय शामराव अण्णांच्या निधनानंतर प्रतिकूल परिस्थितीत राजेंद्र यांनी धैर्याने उभे राहून काम केले याचा मी साक्षीदार आहे. शामराव आण्णांचे त्या काळातील जुने सहकारी व नव्या पिढीतील लोकांना त्यांनी बरोबर घेऊन आपला प्रवास सुरू ठेवला आहे. केवळ समाजकारण, राजकारणच नाही तर धार्मिक कार्यात देखील ते सर्वांबरोबर पुढे असतात. सर्व समाजबांधवांना बरोबर घेऊन प्रत्येक जाती धर्माचा सण अथवा उत्सवामध्ये त्यांचा सहभाग व मदत होत असते. या तरुण कष्टाळू आणि सर्वसामान्यांचा उमद्या नेतृत्वाला म्हणजेच राजेंद्र यांना माझ्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद..!!