कार्य


सहकार व औद्योगिक


शरद सहकारी साखर कारखाना लि.नरंदे

या कारखान्याचा प्रस्ताव तयार करण्यापासून ते जागा खरेदी मशीनरी उभारणी आणि पूर्ण क्षमतेने चालू करून अल्पावधीत एक यशस्वी प्रकल्प म्हणून आज साखर कारखान्याचे सभासद व जनमानसात प्रतिमा निर्माण झाली आहे. यामध्ये संस्थापक कै. शामराव पाटील यड्रावकर यांचेबरोबर कारखाना उभारणी काळात संस्थापक संचालक म्हणून माझा हि महत्वपूर्ण सहभाग होता. सन २००२ पासून मी या कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत आहे.
गत अकरा गळीत हंगामात तीन वेळा राज्य शासनाचे उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा पुरस्कार प्राप्त केले आहेत. त्याचबरोबर कारखाना कर्जमुक्त करून सहवीज निर्मिती प्रकल्प आसवनी प्रकल्पही हाती घेतले आहेत. याबरोबरच ऊस उत्पादकांना उत्तर देताना सभासदांचा हिताच्या योजना राबवित आहोत.पार्वती को-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेट लि., यड्राव

सहकाराच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रात कार्य करताना सर्वप्रथम पार्वती औद्योगिक वसाहतीच्या चेअरमनपदी काम करण्याची संधी मिळाली. पार्वती वसाहतीच्या स्थापनेत माझे वडील कै. शामराव पाटील-यड्रावकर यांचेबरोबर माझाही सहभाग होता. वसाहतीची रचना उभारणी उद्योजकांना सोयीसुविधा देणे. तसेच केंद्र शासनाची क्लस्टर योजना वसाहतीमध्ये राबविणे यासाठी माझे प्रयत्न होते. सुमारे २६६ एकरावर विखुरलेल्या या वसाहतीमध्ये लहान-मोठे तीनशेच्यावर औद्योगिक प्रकल्प सुरू असून या वसाहतीमध्ये जवळपास २५००० कामगार काम करीत आहेत. म्हणूनच ही वसाहत एक आदर्श औद्योगिक वसाहत म्हणून तिचा नामोउल्लेख आहे. यामुळेच महाराष्ट्र राज्य सहकारी औद्योगिक फेडरेशनच्या अध्यक्ष पदी मला काम करण्याची संधी मिळाली.कोल्हापुर जिल्हा शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी लि. राजीव गांधीनगर, इचलकरंजी

माझे वडील कै. शामराव पाटील यांचे निधन व वस्त्रोद्योग व्यवसायासमोरील अडचणी अशा कठीण काळात संस्थेची जबाबदारी माझ्यावरती आली. यावेळी सहकार संचालक माझे बंधू संजय पाटील-यड्रावकर यांचे सहकार्याने सुतगिरणी समर्थपणे चालविताना अडचणीतून बाहेर काढली. सूतगिरणीच्या संचालक म्हणून माझी जबाबदारी पेलत असताना वस्त्रउद्योगाबद्दल चे धोरण, त्यापुढील समस्या व उपाय याबद्दल अभ्यासू विचार अनेक वेळा अखिल भारतीय सहकारी सुतगिरणी संघ लि.मुंबई येथे संचालक म्हणून मांडत आलो. म्हणूनच या संस्थेचे उपाध्यक्ष पद भूषविणेची संधी मला मिळाली.पार्वती सहकारी सूतगिरणी लि. तेरवाड (कुरुंदवाड)ता. शिरोळ

स्व.दे.भ. रत्नाप्पाण्णा कुंभार व स्व. शामराव पाटील-यड्रावकर यांचे प्रयत्नातून शिरोळ तालुक्याच्या पूर्व भागात पार्वती सहकारी सुत गिरणी या संस्थेची स्थापना १९७९ साली झाली. वस्त्रोद्योग व्यवसायासमोरील अडचणीमुळे या ही संस्था पूर्णत्वास येण्यास विलंब झाला. त्यानंतर सन २०११ या संस्थेच्या अध्यक्षपदी माझी निवड झाल्यानंतर माजी उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार साहेब, मा. जयंत पाटील साहेब, मा. हसन मुश्रीफ साहेब यांच्या सहकार्याने, शासनाने वेळोवेळी उपलब्ध करून दिलेल्या आर्थिक सहाय्य मुळे संस्था पूर्णत्वास येऊन एप्रिल २०१४ मध्ये या संस्थेमधून प्रत्यक्ष उत्पादनास सुरुवात झाली आहे.पद्मावती यंत्रमाग सहकारी संस्था मर्या.,यड्राव

राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे लघु उद्योग म्हणून या संस्थेला मान्यता मिळविताना संस्थेच्या माध्यमातून यंत्रमाग युनिट कार्यरत आहेत. यातून बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.शरद विविध कार्यकारी सेवा संस्था मर्या., यड्राव

ता. शिरोळ आमच्या मूळ यड्राव या गावी शरद सोसायटीच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांना पतपुरवठा बी-बियाणे, शेती-अवजारे, खते व औषधे यांचे वितरण करणे बरोबरच संस्थेमार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केले जाते. गृहनिर्माण सहकारी संस्था समाजातील कमी उत्पन्न गटातील कामगार उद्योजक यासाठी निवाऱ्यासाठी सोय व्हावी म्हणून सहकारी हाऊसिंग सोसायटी चा प्रकल्प- १) पार्वती सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या.यड्राव(७० कुटुंब) २) प्रियदर्शनी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., यड्राव स्थापनेत सहभाग व प्रकल्प पूर्ण केले आहेत.


शैक्षणिक व आर्थिक

शैक्षणिक

शामराव पाटील यड्रावकर एज्युकेशनल अॅण्ड चारीटेबल ट्रस्ट., जयसिंगपूर-

शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनियरिंग, यड्राव, ता. शिरोळ

शरद इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (पॉलिटेक्निक),यड्राव, ता. शिरोळ

शरद कृषी महाविद्यालय, जैनापूर, ता. शिरोळ

शामराव पाटील (यड्रावकर) औद्योगिक प्रशिक्षण केंद्र,यड्राव, ता. शिरोळ

ज्ञानगंगा हायस्कूल व प्राथमिक विद्यामंदिर जयसिंगपूर, ता. शिरोळ

दानलिंग विद्यालय उमळवाड, ता. शिरोळ

शरद इंग्लिश मिडीयम स्कूल, यड्राव,ता.शिरोळ

शरद प्ले-ग्रुप अॅण्ड नर्सरी,यड्राव, ता. शिरोळ

आर्थिक

यड्राव को-ऑप. बँकेच्या अध्यक्ष या नात्याने काम पाहत असताना सर्वसामान्य नागरिक, तरुण उद्योजक व शेतकरी यांना अल्पवेळेत पतपुरवठा उपलब्ध व्हावा व त्यांचे आर्थिक पत सुधारून त्यांचे जीवनमान उंचवावे तसेच त्यांना बचतीची सवय लागावी यासाठी प्रयत्नशील आहे. एक मुख्य शाखा व दोन शाखेसह कार्यक्षम बँक म्हणून नावारुपास आलेली आहे.


सामाजिक व धार्मिक


राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशन

राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशन ची स्थापना करून विविध सामाजिक कार्यक्रम राबविले आहेत. यामध्ये गरीब, कष्टकरी व श्रमजीवी आर्थिक दुर्बलांसाठी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना शासन व मा.आमदार हसन मुश्रीफ (माजी मंत्री) यांच्या सहकार्यातून हृदयरोग, कॅन्सर, किडनी प्रत्यारोपण, अस्थिरोग इ. सारख्या अवघड व खर्चीक शस्त्रक्रिया मुंबईमधील नामांकित हॉस्पिटल मधून मोफत करून घेतलेल्या आहेत. आज पर्यंत याचा लाभ जवळपास 540 रुग्णांना मिळालेला आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण कॅम्प, एम.पी.एस.सी. मार्गदर्शन शिबिर, शेतकऱ्यांसाठी कृषी मार्गदर्शन मिळावे, आरोग्य शिबिर असे उपक्रम राबविले आहेत.अपंग कल्याण व पुनर्वसन संस्था,नांदणी

अपंग कल्याण व पुनर्वसन संस्था,नांदणीची स्थापना करून यामध्ये अपंगांना जयपूर फूटस, तीनचाकी सायकल, कुबड्या, श्रवणयंत्रे, इ. पुरवठा केला आहे. अपंग पुनर्वसन केंद्र व विविध शासकीय व खाजगी दवाखाने यांच्या संयुक्त सहकार्यातून अनेक अपंगांच्या मोफत शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. त्याचबरोबर अपंगांसाठी प्रतिवर्षी धार्मिक स्थळांच्या सहलीचे आयोजन केले जाते.राजेंद्र पाटील-यड्रावकर महाराष्ट्र राज्य मोबाईल टॉवर सुरक्षारक्षक संघटना

राजेंद्र पाटील-यड्रावकर महाराष्ट्र राज्य मोबाईल टॉवर सुरक्षारक्षक संघटना - महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या या क्षेत्रातील असंघटित कामगारांना एकत्र करून मा.आमदार हसन मुश्रीफ(माजी मंत्री) यांच्या सहकार्याने शासनाच्या विविध योजना व कामगार कायद्याचा लाभ मिळवून देताना या संस्थेअंतर्गत काम करणाऱ्या जवळपास ११०० तरुणांना आर्थिक व सामाजिक स्थैर्य प्राप्त करून दिले.ओंकारेश्वर मंदिर ट्रस्ट यड्राव व दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट जयसिंगपूर

ओंकारेश्वर मंदिर ट्रस्ट यड्राव व दिगंबर जैन मंदिर ट्रस्ट जयसिंगपूर ता. शिरोळ या ट्रस्टचा अध्यक्ष म्हणून कार्यभार पाहताना सर्व समाज बांधवांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करताना मुलांसाठी संस्कार शिबिरे, युवकांसाठी व्यसनमुक्ती, योगाभ्यास शिबिरांबरोबरच अनेक धार्मिक वा अध्यात्मिक व्याख्यान व प्रवचनाची परंपरा जपली आहे.


राजकीय